खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. कोविड-19चे नियम पाळत नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्यात आला. प्रारंभी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्थायी कमिटी अध्यक्ष …
Read More »अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी आम्ही घडवला इतिहास : श्रीकांत काकतीकर
दुर्गम घनदाट जंगलातील नदी किनाऱ्यावर लसीकरण आणि आरोग्य शिबीर बेळगाव : आज देशभरात सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सर्व जण आपापल्यापरीने आनंदात घालवत होते. अशा या आनंदाच्या दिवशी धो-धो कोसळणाऱ्या पावसात, दुर्गम भागातील घनदाट जंगलातील, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून चालत जात. कणकुंबी प्राथमिक आरोग्य …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा : पुंडलिक पाटील
करंबळ ग्रामस्थांकडून पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन समिती नेते पुंडलिक …
Read More »खानापूर नगरपंचायतीची बैठक संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची बैठक नगरपंचतीच्या सभागृहात सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.यावेळी बैठकीत देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा खानापूर शहरातील हाॅटेल, हेअर कटींग, सार्वजनिक ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यासाठी याठिकाणी सॅनिटायझर, मास्क, सोशल टिस्टन व स्वच्छता आदी नियमाचे पालन …
Read More »हलशीवाडी येथे चिकनगुनिया, डेंगू लसीकरण
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …
Read More »वन हक्काचा कायदा आदिवासी कष्टकरी जनतेच्या हितासाठी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात हजारो वर्षापासून इथे गवळी धनगर समाजासह अनेक वननिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना अतिक्रमित ठरवून त्यांना जंगलातून बाहेर काढण्याचे धोरण शासन घेऊ पाहत आहे. पण या देशातील आदिवासी कष्टकरी जनतेच्या लढ्यातून वन हक्काचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने जंगलावरच्या अधिकारा बरोबर कसत असलेल्या वन जमिनी कायम …
Read More »मुसळधार पावसाने आंबेवाडी रस्त्याची झाली दुर्दशा
खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली. या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे …
Read More »युवकांनी लढण्याची जिद्द बाळगावी : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी
खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. …
Read More »खानापूरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविडचे नियम बंधनकारक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांना गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे पाठविण्याचा संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा …
Read More »