खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात भाजपच्या डाॅ सोनाली सरनोबत याच्या तक्रार निवारण केंद्राचे उदघाट माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ सोनाली सरनोबत होत्या. यावेळी उदघाटक म्हणून माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील होते. भाजपचे विजय कामत ,युवा नेता पंडित ओगले, अॅड चेतन मनेरीकर, , प्रदीप सानिकोप, बसवराज बडगेर, बसवराज हाबळी, परशराम पाटील, दत्ताराम पाटील, परशराम कोलकार, आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्या च्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले की, खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या दिवसेदिवस वाढत याची दखल घेऊन भाजपच्या नेत्या डॉ सोनाली सरनोबत यानी स्वता भाजप वतीने तक्रार निवारण केंद्र उभारले. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी आपल्या कोणत्याही तक्रारी असतील तर खानापूर भाजपच्या तक्रार निवारण केंद्रात घेऊन याव्यात. त्याचे वेळेत निवारण होईल. कोणत्याही कार्यालयात जाऊन वेळ पैसा वाया घालु नका असे सांगीतले.
यावेळी डाॅ सोनाली सरनोबत म्हणाल्या की तालुक्यातील जनतेच्या अनेक समस्या जवळुन पाहिल्या त्यामुळे तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थिताची भाषणे झाली.
कार्यक्रमाला गंगाराम कदम,यशवंत कोडोळी,प्रशात सानिकोप बसवराज इटीन,गायत्री मादार, भारती तेगडी, आदी उपस्थित होते.