खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विकासापासून वंचित आहेत. अशा तालुक्यातील ७३ गावात अद्याप स्मशानभूमीची सोय नाही. एकीकडे जंगलाने व्यापलेला तालुका असुन जवळपास ३९ गावांत वनजमिनी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ३४ गावातून सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत. तेथे सहकारी जमिनी खरेदी करण्यात येणार आहे. तेव्हा स्मशानभूमीसाठी जागा खेरदी करायची असेल अथवा …
Read More »घोटगाळी ग्राम पंचायतवरील आरोप बिनबुडाचे : अध्यक्ष संतोष मिराशी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची उद्या कुप्पटगिरीत जनजागृती सभा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त मारुती नारायण दळवी यांचा सत्कार!
खानापूर : ब्रँच पोस्टमास्तर मणतुर्गा मारुती नारायण दळवी यांचा मुदतपूर्व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ खानापूर पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य डाकघर खानापूर पोस्टमास्तर विरभद्रप्पा बेंचनमर्डी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ सब डिव्हिजन बेळगाव श्री. बी. पी. माळगी, माजी तालुका पंचायत सदस्य मणतुर्गा बाळासाहेब महादेवराव शेलार, …
Read More »गर्लगुंजीत भंडार्याची उधळण करत लक्ष्मी, मर्याम्मा देवीच्या मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मर्याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्ष्मी आणि मर्याम्मा देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मंगळवारी दि. 3 मे रोजी गावची ग्रामदेवता माऊली मंदिरापासून मुर्तीच्या मिरवणुकीला मंगळवारी पहाटेपासून वाद्याच्या तालावर व भंडार्याची उधळण करत गावच्या पंचाच्या व मानकर्यांच्याहस्ते …
Read More »खानापूर शिवबसवजयंती साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवबसव जयंती उत्सव यांच्यावतीने सोमवारी दि. २ रोजी सकाळी शिवबसवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या शिवसवजयंतीला भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे …
Read More »खानापूर म. ए. समितीची निर्धार सभा ५ मे रोजी
कुप्पटगिरी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या गावातून. खानापूर : १ मे २०२२ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १६ सदस्यांची बैठक माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, माजी जि. पं. …
Read More »पंडित ओगलेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच भाजपच्यावतीने तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच बुधवारी दि. २७ रोजी मध्यरात्री …
Read More »खानापूर क्षत्रिय मराठा परिषद कार्यक्रमाच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशन
खानापूर : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे 2022 रोजी प. पू. श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा सत्कार व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे …
Read More »खानापूरात शिवजयंती, बसवजयंती, रमजाननिमित्त शांतता बैठक संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात होणाऱ्या दि. २ मे व दि. ३ रोजी शिव जयंती, बसव जयंती त्याचबरोबर रमजान ईद तसेच चर्च यात्रा आदी उत्सव शांततेत, उत्साहात पार पाडण्यासाठी येथील तालुका पंचायत सभागृहात शांतता कमिटीची बैठक गुरूवारी दि. २८ रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रविण जैन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta