Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थितीत हायटेक बस स्थानकातील नूतन “श्री गणेश हॉटेल(कॅन्टीन)चा उद्या शुभारंभ!

  खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर श्री …

Read More »

तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …

Read More »

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन

  खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे …

Read More »

जांबोटी, नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात खानापूर समितीच्या वतीने जनजागृती!

  खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे म्हणून सर्वत्र …

Read More »

खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर

  खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल मारूती नगर खानापूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शिबीराला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार सेक्रेटरी एआयसीसी …

Read More »

महामेळाव्यास खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवस्मारक भवन येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई हे होते. यावेळी कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे दिनांक …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवारी

  खानापूर : बेळगाव येथे 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली …

Read More »

खानापूर – पारीश्वाड मार्गावर दुचाकी – बसचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

  खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात दोड्डहोसुर येथील दुचाकीस्वार जागीच झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव गोविंद उर्फ संदेश गोपाळ तिवोलीकर रा. दोड्डहोसुर असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की. केएसआरटीसीची बस चापगांवकडून खानापूरकडे येत होती, तर …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील कबड्डी खेळाडूंनी गेल्या महिन्याभरात विविध क्रीडांगणे गाजवत आपला खेळातील रुबाब कायम चढत्या क्रमाने ठेवला आहे. 2024- 25 या वर्षाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चिकोडी या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघ उतरला,या संघात मराठा मंडळ ताराराणी …

Read More »

हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर

  खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून वासुदेव देसाई याने तयार करण्यात आलेल्या सिंहगड किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर सोहम देसाई प्रतापगड द्वितीय तर दत्तात्रय देसाई यांच्या मल्हारगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी युवा स्पोर्टसतर्फे दिवाळीनिमित्त गाव मर्यादित केला …

Read More »