Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी

Spread the love

 

रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे.

देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून टँकर हटवण्याचे प्रयत्न संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *