खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, ज्ञानेश्वर मंदिर चिरमूरकर गल्ली खानापूर या ठिकाणी, संघटनेचे अध्यक्ष श्री. वीरभद्र बनोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक वक्ते या सभेला हजर …
Read More »मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न
खानापूर (उदय कापोलकर) : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे परमपूज्य मोक्षत्मानंद स्वामीजी बोलताना म्हणाले “आजचे युग ही विज्ञानवादी युग आहे.. जर चांगले विद्यार्थी, चांगली पिढी घडावयाची असल्यास शिक्षकाने देखील आधुनिकतेची कास धरावयास हवी. शिक्षकाने दिलेल्या …
Read More »सार्वजनिक श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन खानापूर : शहर आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाची विशेष शांतता कमिटीची बैठक शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी अकरा वाजता तालुका पंचायत कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. व्यासपीठावर तहसीलदार श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. मंजुनाथ नाईक, तालुका पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी इगनगौडा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, हेस्कॉमचे …
Read More »चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्या त्वरित सोडवा
पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे आमदारांना निवेदन खानापूर : चापगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांना पंचक्रोशीतील जनतेच्यावतीने चापगाव येथील दहीकाला कार्यक्रमावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, पंचमंडळी, ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य उपस्थित होते. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने भात पिकासह इतर पिके …
Read More »वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू; हलशीवाडी ग्रामस्थांचा इशारा
खानापूर : वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यांनी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेल्या आठ दिवसात हलशी, हलशीवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच ५० …
Read More »खानापूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे 29 ऑक्टोबर रोजी आयोजन
बेळगाव : खानापूर हाफ मॅरेथॉन 2023 स्पर्धा 29 ऑक्टोबर 2023 रोजी मलप्रभा मैदान, खानापूर येथे होणार आहे. तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून त्यामध्ये हाफ मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी, 5 किमी आणि 3 किमीची फन रन असणार आहे. या स्पर्धेतील …
Read More »खानापूर तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी
खानापूर : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर येथील तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती बुधवारी दि. ६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमनकर, उपतहसीलदार के. आर. कोलकार, …
Read More »शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशीच संगरगाळी शाळेत मद्यपी शिक्षकाचा प्रताप
शिक्षकाच्या विरोधात बीईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिन साजरा झाल्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दि. ६ सप्टेंबर रोजी संगरगाळी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेत शाळेचे मुख्याध्यापक मद्यपान करून धिंगाणा घातल्याचे दिसून आले. लागलीच संगरगाळी शाळेच्या मद्यपान शिक्षकावर कारवाई करावी. या मागणीसाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना …
Read More »खानापूरात भाजप रयत मोर्चाच्यावतीने काँग्रेस सरकार विरोधी मोर्चा सोमवारी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने योग्य साथ दिली त्यामुळे तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीही सवलती दिली नाही. शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी योजना …
Read More »खानापूर नगरपंचायतीची सूत्रे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी स्वीकारली
खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वटारी यांना मोकळीक देऊन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या जागी संतोष कुरबेटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी खानापूर येथे उपस्थित राहून आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अभियंता तिरुपती लमानी, राजु जांबोटी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, शोभा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta