बेळगाव : बेळगावात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून व्यापाऱ्यांना, मराठी भाषिकांना वेठीस धरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर येत्या २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बेळगावसह राज्यात दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी …
Read More »प्लंबिंग करताना विद्युत भारित विजेचा धक्का लागून वड्डेबैलचा युवक जागीच ठार!
खानापूर : हनुमान नगर बेळगाव येथे प्लंबिंग कामासाठी गेलेल्या खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील एका प्लंबर कामगाराचा विद्युतभारित विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव महेश परशराम पाटील (वय 21 वर्षे) राहणार वड्डेबैल ता. खानापूर असे आहे. …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : 16 जानेवारी 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेची घोषणा झाली आणि मराठी बहुल भाग तत्कालीन मैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याच्या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी मराठी भाषिक रस्त्यावर उतरले व मोठा जनक्षोभ उसळला. त्यावेळी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमा भागातील अनेकांना बलिदान प्राप्त झाले. 17 जानेवारी रोजी या हुतात्म्यांना …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक रविवार दि. ७ रोजी दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये १७ जानेवारी हुतात्मादिन गांभीर्याने पाळणे व कर्नाटक सरकारच्या आश्रयाखाली कन्नड संघटनांनी सुरू केलेल्या कन्नडसक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. …
Read More »खानापूर तालुक्यातील कंत्राटी कामे स्थानिक कंत्राटदारांना द्यावे
खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत निर्णय खानापूर : दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व खानापूर तालुक्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या उपस्थितीत आमदारांच्या कार्यालयात सदर बैठक संपन्न झाली. यावेळी खानापूर …
Read More »बेकवाड येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने युवकाचा जागीच मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील बेकवाड येथे शेतवडीतील बोअरवेल सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर चांगप्पा माळवी (वय 34) राहणार झुंजवाड असे आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर माळवी हे आपल्या …
Read More »खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी गावात चोरी
गरिबांच्या बचतीवर चोरांचा डल्ला खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथे आज दिवसाढवळ्या चोरट्यानी आपला मोर्चा वळवला व तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. नारायण लक्ष्मण सुतार यांच्या घरातील परसुतून चोरट्यानी आत प्रवेश केला व सामानाची नासधूस केली. ट्रांक पेटीतील रोख रक्कम व चांदीची जोडवी चोरली, आज चन्नेवाडी गावात एका वृद्धेचे …
Read More »खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा 13 वा वर्धापन दिन थाटात
खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांचा १३वा अमृतमहोत्सव शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री. बाळू बाबू पाटील सेवानिवृत्त शिक्षक झुंजवाड, श्री. गंगाधर दौलतराव देसाई निवृत्त शिक्षक निडगल, सौ. वासंती बाबूराव …
Read More »भात खरेदी दलालाकडून वजनात काटेमारी
खानापूर : सध्या भात मळणीचे हंगाम सुरू असून मळणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतातच आपलं भात दलालाना विकत असतात, परंतु कापोली येथे एका शेतवडीत शेतकऱ्यांचे भात खरेदीसाठी आलेल्या दलालावर शेतकऱ्यांना संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात वजन काटा हाताळण्याचे रिमोट कंट्रोल मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. भात …
Read More »ट्रेकसाठी जंगलात गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका!
खानापूर : ट्रेकसाठी गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची गोवा आणि कर्नाटक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या अथक परिश्रमानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. याबाबत मिळालेली माहिती की, गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवाड गावाच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावनी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील 9 विद्यार्थी शुक्रवारी दुपारी चार दुचाकींवरून गेले होते. पारवाड गावापासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta