Tuesday , April 21 2026
Breaking News

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एम. एस. देवकरी यांची निवड

Spread the love

 

खानापूर : गुरुवारी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये खानापूर तालुक्यातून मणतुर्गा पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक एम. एस. देवकरी यांची निवड करण्यात आली आहे.

एम. एस. देवकरी हे खानापूर तालुक्यातील मूळचे मणतुर्गा गावचे असून त्यांनी गेल्या 9 वर्षापासून आपल्या जन्म गावातच सहशिक्षक म्हणून सेवा बजावत आले आहेत. त्यांनी गेली 30 वर्षे एक प्रामाणिक सेवा बजावून विविध शाळांमध्ये नोकरी केली आहे. त्यांनी हुक्केरी तालुक्यात 5 वर्षे, नंदीहळी येथे 2 वर्ष तर तिवोली येथे सरकारी पूर्ण प्राथमिक शाळेत 12 वर्षे सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांनी मणतूर्गा शाळेत आपली सेवा कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी रोटरी क्लब बेळगावच्या वतीने जिल्हा पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला आहे. आता बेळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण खात्याच्या वतीने घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या गुरुवारी बेळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गुरुवंदना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विक्रीत केला जाणार आहे. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *