खानापूर : गावातील मूलभूत सुविधांसाठी हिरेहट्टीहोळी येथे काही ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य गेल्या ३-४ दिवसापासून पंचायती समोर उपोषणाला बसले होते. यासंदर्भात माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना माहिती मिळताच त्यांनी खानापूरचे तहसिलदार यांना हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषणा संदर्भात चर्चा करून योग्य तोडगा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज हिरेहट्टीहोळी येथे खानापूर तहसिलदार, तालुका पंचायत ईओ, पीडीओ, खानापूर पीएसआय तसेच ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, सुरेश जाधव, संगाप्पा वाली, तोहीद चांदखन्नावर, अशोक अंगडी आदी कॉंग्रेसचे नेते मंडळी सुद्धा हिरेहट्टीहोळी येथे दाखल झाले. सर्व समस्यांची पहाणी केली व नंतर उपोषणकर्त्यांसोबत तसेच ग्रामपचंयात अध्यक्ष लावगी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शेवटी तहसिलदार यांनी सकारात्मक चर्चा घडवून विषय मार्गी लावून देतो असे सांगून उपोषणकर्त्यांची समजून काढली व शेवटी उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ हिरेहट्टीहोळी, पंचायतचे सदस्य, पंचमंडळी, कॉंग्रेसचे पदाधिकारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. अंजलीताई निंबाळकर या नेहमीच गावकऱ्यांसोबत असतात. त्यांचा दृष्टिकोण सकारात्मक असतो. गावात भाडंणतंटा होऊ नये. गाव एकोप्याने रहावे हाच मुळ हेतु माजी आमदारांचा असतो.