मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन …
Read More »डॉ. चारुदत्त कासार यांना पीएचडी प्रदान
निपाणी (वार्ता) : चिकोडी तालुका शिक्षण संस्थेच्या श्रीमती ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. चारुदत्त भालचंद्र कासार यांना धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. धारवाड येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलाधिपती व राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. …
Read More »बद्रीकेदारची सायकल यात्रा करुन सदलग्याचा प्रविण मडिवाळ स्वग्रामी सुखरूप परत
सदलगा : येथील प्रविण इराप्पा मडिवाळ (वय २२ वर्षे) आणि त्याचा मित्र गौरव पाटील (म्हाकवे, ता. कागल) असे दोघेजण २५ सप्टेंबर रोजी सदलगा आणि म्हाकवे येथून बद्रीनाथ, केदारनाथकडे सायकल प्रवासासाठी निघाले होते. पहिला मुक्काम त्यांनी कराडमध्ये केला होता. दोघेही तरुण दररोज सुमारे १२० ते १३० किमी चा प्रवास करत, …
Read More »कार-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; भाऊ-बहीण ठार
बेळगाव : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जात असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ मंगळवारी हा अपघात झाला. प्रशांत तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका तुळशीकट्टी (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत व त्याची बहीण प्रियांका हे दोघे दुचाकीने चिक्कोडीला परटी …
Read More »माजी सैनिकाचा गळा आवळून खून; चिक्कोडी तालुक्यातील घटना
चिक्कोडी : बहिणीच्या नवऱ्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मेहुण्याने दाजीचा गळा आवळून खून केल्याची घटना चिक्कोडी शहरातील विद्यानगरमध्ये घडली. जैनापूर गावातील माजी सैनिक आणि क्रशर मालक इरगौडा शिवपुत्र टोपगोळ (४५) याचा मृत्यू झाला आहे. चिक्कोडी शहरातील विद्यानगर येथील राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. मेहुणा संजय भाकरे …
Read More »हिरेकोडी येथे लग्न समारंभात अन्नातून विषबाधा; १०० हून अधिक अत्यवस्थ
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर विषबाधा होऊन १०० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली. झाकीर पटेल यांच्या मुलीचे काल लग्न झाले. या पार्श्वभूमीवर हिरेकोडी गावाच्या शिवारात भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतलेल्या …
Read More »चिक्कोडी येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा …
Read More »मंगसुळीत राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत …
Read More »जैन मुनींना एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
बेळगाव : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा निषेधार्ह व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी मांजरी ता. चिक्कोडी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने मांजरी बस स्थानकाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भावप्रतिमेचे पुजा डॉ. …
Read More »नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. वडागोळ गावातील अण्णाप्पा नायडू खोत (४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी आण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट …
Read More »