चिक्कोडी : चिक्कोडी येथे पोलिसांची धडक कारवाई करून तब्बल सोळा लाखांची रक्कम जप्त केली आहे. रात्री उशिरा चिक्कोडी बसस्थानकावर पोलिसांच्या तपासणीत ही रक्कम सापडली. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सक्रिय झाले आहेत. तसेच चिक्कोडी येथे पोलिसांनी धडक कारवाई केली, रात्री उशिरा चिक्कोडी बस स्थानकावर पोलिसांनी केलेल्या बसच्या तपासणीत विना कागदपत्रे पैसे सापडले. बसमधून कागदपत्रांशिवाय 16 लाख 31 हजार रुपयांची वाहतूक केली जात होती. ही रक्कम जपत करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील चिक्कोडीहून इचलकरंजी शहराकडे जाणाऱ्या बसच्या तपासणीदरम्यान हे बेहिशेबी पैसे सापडले. अवैध पैशांसोबतच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. अटक केलेले दोघे हे महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवले आहे. ही घटना चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.