Tuesday , December 3 2024
Breaking News

निपाणी

विणकरांसाठी पॅकेज मंजूरमुळे मंत्री पाटील यांचा अथणी येथे सत्कार

निपाणी : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडले आहेत. कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक विणकरांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत होती. यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ३५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे व प्रत्येक विणकरांना ३ हजार रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग …

Read More »

बेळगावसह 11 जिल्ह्यात लॉकडाऊन २१ जूनपर्यंत वाढवला

बेंगळुरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पालकमत्र्यांना दिल्या आहेत. कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अजुनही कमी झाला नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा केली.मागील लॉकडाऊन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध …

Read More »

बोरगाव नगरविकास अधिकारी  देवमाने यांची बदली

शहरवासीयांकडून संतापाच्या प्रतिक्रिया : कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी निपाणी : बोरगाव नगरपंचायतीचे नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने यांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येला आळा बसला होता. असे असतानाही प्रशासनाने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने शहरवासियांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बोरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने हे नगर पंचायतीचा …

Read More »

महात्मा बसवेश्वरतर्फे लवकरच सिटीस्कॅनची सोय

 संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी  : कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी  डॉक्टर, नर्स, विविध सामाजिक संघटना रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द संस्थेचा सहभाग असावा, या उद्देशाने संस्थेतर्फे …

Read More »

कोरोनाने गुंडाळला कापड व्यवसाय!

व्यावसायिक बनले कर्जबाजारी : लगीनसराई, उत्सव बंद असल्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने अनेक निर्बंध  घालत अत्यावश्यक सेवा विक्री व्यवसाय सुरू आहे. मात्र निपाणी तालुक्यातील कापड दुकानदारांची मागील दोन वर्षांची कोट्यवधीची उलाढाल या परिस्थितीमुळे बुडाली आहे. लग्न समारंभ, यात्रा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना बंदी …

Read More »

सीडी वर्कना भगदाड, वाहनधारकांची धडधड

रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष निपाणी (संजय सूर्यवंशी) : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

कुर्लीच्या चौगुलेंचा आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत सहभाग

प्राथमिक लघुग्रह शोधण्यात यश : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सुर्यवंशी) : नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल सर्च कोलॅबरेशन नासा, विपनेट क्लब विज्ञान प्रसार आणि सप्तऋषी विपनेट कॅम्प इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिम व पृथ्वीच्या कक्षेतील ऑब्जेक्ट सर्च कॅम्प 03 ते 28 मे 2021 अखेर झाला. …

Read More »

शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसह व्यावसायिकांना अनुदान द्या

तिसर्‍या आघाडीचे तहसीलदारांना निवेदन : कोरोनामुळे मयत कुटुंबियांना भरपाई द्यावी निपाणी (संजय सुर्यवंशी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासह लहान-मोठ्या व्यवसायिकांना …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

पोलिस बंदोबस्त कायम : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्‍या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेजारीच असणार्‍या महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन शिथील झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या …

Read More »

 कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा निपाणीत बुडून मृत्यू

100 फूट खोलीतून काढला मृतदेह : कोल्हापूरच्या जीवरक्षकाला पाचारण निपाणी (संजय सूर्यवंशी) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.8) सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या …

Read More »