सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुर्ली फाटा येथील अन्नपुर्णा हाॅटेल समोर धावत्या दुचाकीचा टायर पंक्चर होऊन झालेल्या अपघात महिला व युवती ठार झाल्या. तर दुचाकीस्वार व बालक गंभीर जखमी झाले. लक्ष्मी आनंद कोप्पद (वय २५, रा. मुगळीहाळ, ता. सौंदत्ती व भाग्यश्री सागर वाकमी …
Read More »मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोगनोळी : येथील लाखो जणांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन कर्नाटक राज्य धर्मादाय हाज वक्फ मंत्री शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले. श्री अंबिका देवीची ओटी भरून गोरगरिबांच्या हितासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार फंडातून मंजूर करून दिलेल्या अंबिका भवनच्या कामकाजाची पाहणी केली. कोणत्याही प्रकारची …
Read More »कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात
हजारो भाविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोमवार (तारीख 3) जागर सोहळ्यानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 8 वाजता देवीची आरती करून सजविलेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »’गौरी गणेश’ने महिला सबलीकरणाला महत्त्व दिले
अध्यक्षा अश्विनी मगदूम : वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत, महिलांनी सुसंस्कृत कुटुंब निर्माण केले पाहिजे. त्या सुसंस्कृत कुटुंबातून चांगले समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे, या हेतूने गौरी गणेश पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन प्रत्येक महिला सभासदांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरणासाठी …
Read More »समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा गांधींचे विचार आवश्यक : तृप्ती भाभी शाह
देवचंदमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : समाजाच्या उन्नतीवर देशाची उन्नती अवलंबून असते. समाजाचा विकास होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. सत्य अहिंसा, स्वच्छता यांचा अवलंब केल्यास समाज प्रगतीपथाच्या मार्गावर जाईल, असे विचार तृप्ती भाभी शाह त्यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना योजना -2 …
Read More »डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना पीएचडी प्रदान
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेब गोरवाडे यांचे सुपुत्र डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी पदवी मिळाली. वीरकुमार यांनी ’आग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर विषय सादर केला होता. त्यांनी सादर केलेला या विषयावर शिवाजी विद्यापीठाचा शेती रसायन व कीट व्यवस्थापन विभागाकडून विशेष असे …
Read More »महात्मा गांधीजींच्या विचारांची देशाला गरज
युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे …
Read More »नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
गांधी जयंतीचे औचित्य : घंटागाडीला कचरा देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले होते. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२) सकाळी महात्मा गांधी चौक परिसर, …
Read More »स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान
मंत्री शशिकला जोल्ले :निपाणीत गांधी पुतळ्याचे अनावरण निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजीसह क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी निपाणी येथे येऊन केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या जागेला गांधी चौक असे नाव दिले होते. त्यानंतर गांधी पुतळा करणे आवश्यक असताना केवळ चबुतराचा होता. नगरपालिका सभागृहासह नागरिकांच्या …
Read More »महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपा
खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta