विरुपाक्षलिंग समाधी मठाचा उपक्रम : खबरदारी घेण्याचे आवाहन निपाणी : शहर आणि परिसरातील भक्तांनी यमगरणी येथे नदीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. त्यातील अनेक गणेश मूर्ती पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बाहेर पडल्या होत्या. याची दखल घेऊन येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींनी मठाचे कार्यकर्तेच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर रविवारी …
Read More »अन्नदान करताना मनाला वेगळी अनुभुमती!
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत महाप्रसादाचे वाटप निपाणी : स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांनी रत्नशास्त्राबरोबर सामाजिक उपक्रमातील सहभाग कायम ठेवला होता. महाप्रसाद अथवा अन्य स्वरूपात अन्नदान करण्याचा ते नेहमी प्रयत्नशील असत. ही परंपरा मोतीवाला परिवाराकडून नेहमी जपणूक केली जात आहे. महाप्रसदाच्या रूपाने अन्नदान करताना मनाला एक वेगळी अनुभुमती येत …
Read More »महालसीकरणात 5 हजार नागरिकांना लस
निपाणी परिसरातील विविध केंद्रांवर लस : लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी निपाणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या महालसीकरण मोहिमेत निपाणी शहरासह अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या ममदापूर (के. एल. ) अकोळ, पडलिहाळ, जत्राट, लखनापूर, कोडणी आदी गावांमध्ये दिवसभरात पाच हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक केंद्रे निर्माण …
Read More »बोरगाव सीमा नाक्यावर वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलन
शिरोळ तालुका शिवसेनेचा इशारा : प्रवासी, अधिकार्यामध्ये वादावादी निपाणी : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक राज्यात सर्वच सीमेवर आरटीपीसीआर तपासणी नाके उभारले आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागावर दररोज संपर्कात असणार्या प्रवासी शेतकरी विद्यार्थी व मजूर यांना मुभा देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे. मात्र कार्यरत असलेले अधिकारी हे प्रवाशांना अडविणे, त्यांना त्रास …
Read More »बीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचा हणबरवाडी ग्रामस्थांच्याकडून सत्कार
कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथील, जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघास धान्य विक्री केंद्र मंजूर करून दिल्याबद्दल माजी खासदार व बीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचा चेअरमन मारुती कोळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी सत्याप्पा बन्ने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी …
Read More »कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे मोफत दंत चिकित्सा शिबीर
निपाणी : येथील कोल्हापूर वेळेस व्यापारी मित्र मंडळ आणि महावीर मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. मंडळाचे उपाध्यक्ष राजू शिंदे यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रथमेश जासूद यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. चंद्रकांत …
Read More »कोल्हापूर-बेळगांव मार्गावरील एसटी बस सुरू करा
प्रा. राजन चिकोडे : प्रवाशांचा नाहक त्रास वाचवावा निपाणी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने आंतरराज्य एसटी बस प्रवेशबंदी केली आहे. यामुळे कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य उपचारासाठी या मार्गावरील प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागल ते निपाणी या 19 …
Read More »दुचाकी अपघातात युवक ठार
ममदापूर येथील घटना; दोघेजण गंभीर निपाणी : निपाणी इचलकंजी मार्गावर ममदापूर (केएल) येथील अंबिका देवालयाजवळ दुचाकीला अपघात होऊन युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अनिकेत सुरेश यादव (रा. ममदापूर, वय 20) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अनिकेत यादव हा संकेत संतोष कदम …
Read More »शेतकर्यांवर अन्याय झाल्यास आंदोलन
राजू पोवार : ग्रामीण पोलिस ठाण्याला निवेदन निपाणी : कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त परिसरातील जमीन आरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होणार असून याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा …
Read More »आंबा मार्केटमध्ये रस्त्यासह सुविधा द्या
माजी नगरसेवक जुबेर बागवान : पालिका पदाधिकार्यांना निवेदन निपाणी : येथील आंबा मार्केटमध्ये बर्याच वर्षापासून भाजीपाला व फळमार्केट भरत आहे. शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी व शेतकरी खरेदी-विक्रीच्या निमित्ताने येतात. पण दरवर्षी पावसाळ्यात दलदल निर्माण होऊन सर्वांची गैरसोय होत आहे. शिवाय विक्रीसाठी आलेला माल चिखलात ठेवावा लागत असल्याने दर कमीजास्त मिळत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta