Monday , September 21 2026
Breaking News

कोगनोळी येथे बांबरवाडीचा श्वान प्रथम

Spread the love

कोगनोळी : येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील व महिला प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबिका स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित श्वान स्पर्धेत बांबरवाडी येथील हनुमान प्रसन्न राणू या श्वानने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत अक्षय खोत हणबरवाडी, ज्ञानदा कोळेकर कोल्हापूर, रोहित जाधव, गणेश कोल्हापूर आदींच्या श्वानचा क्रमांक आला‌. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी खोत, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, दिलीप पाटील, धनाजी पाटील, संदीप डोंगळे, रोहित माणकापुरे, आप्पासो खोत, अभी निकम, राहुल पाटील, निखिल गुरव, दादू किस्के यांच्यासह अन्य मान्यवर, अंबिका स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *