Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

  नगरसेवक विलास गाडीवड्डर : केतेश्वर समाजभवनाचा वास्तुशांती समारंभ निपाणी (वार्ता) : बुरुड समाजाच्या मागणीनुसार आठ वर्षांपूर्वी येथील महाबळेश्वरनगर परिसरात समुदायभावनासाठी चार गुंठे जागा नगरपालिकेतर्फे दिली होती. शिवाय दहा लाखाचा निधीही मंजूर केला होता. या समाजभावनाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील कामकाजासाठीही निधी मंजूर करणार आहोत. समाज बांधवांनी एकत्रित राहून …

Read More »

नगरपालिका कार्यालयावरील नवीन भगवा ध्वज फडकवण्याच्या माहितीबाबत नवनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका कार्यालयावर अनेक वर्षापासून भगवा ध्वज फडकला आहे. सध्या हा ध्वज जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी मराठी भाषिकातर्फे नवीन ध्वज फडकवण्यात येणार होता. त्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने नवनाथ चव्हाण यांच्यावर शहरातील नागरिकांच्या भावना भडकविण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर येथील पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई लढणार

  राजू पोवार ; ऊस दर आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. पण त्यांनी उत्पादन केलेल्या पिकांना योग्य दर दिला जात नाही. त्याचा सर्वच फायदा साखर कारखानदार आणि सरकारला होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या कडे वळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उसाला …

Read More »

महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात संघर्ष : नायक दीपक केदार

  निपाणी ऑल इंडिया दलित पँथरची बैठक निपाणी (वार्ता) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार धोक्यात आले आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पँथर सेना ही केवळ दिखाऊणा नसून तो एक विचार असल्याचे …

Read More »

निपाणी परिसरात गोरज मुहूर्तावर उडाला तुळशी विवाहचा बार

  भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तुळशी विवाहाची प्रतीक्षा केली. अखेर सोमवारी (ता.३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोबाईल वरील मंगलाष्टीकेवर निपाणी आणि परिसरात तुळशी विवाहाचा बार उडवून दिला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजलया पासून घरोघरी महिलांची तयारी …

Read More »

गनिमी काव्याने नगरपालिकेवर नवीन ध्वज फडकणारच

  स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर …

Read More »

निपाणी नगरपालिका कार्यालयावर बुधवारी नवीन भगवा ध्वज फडकणार

  निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांची अस्मिता असलेल्या आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयावरील भगवा ध्वज जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता‌ मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन भगवा ध्वज ‌उभारण्यात येणार आहे. सदरचा भगवा ध्वज छत्रपती …

Read More »

बोरगाव दर्गा परिसरातील नगारखाना वास्तूचे लवकरच लोकार्पण

  फिरोज अफराज; नगर खाण्यासाठी आमदार जोल्ले दांपत्यांचे प्रयत्न निपाणी (वार्ता) :बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावा ढंग वली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस शुक्रवार (ता.६ )ते रविवार ( ता.९) अखेर होणार आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरातील प्रवेशद्वाराजवळ आमदार शशिकला जोल्ले व डीसीसी बँकचे नूतन संचालक आणि माजी खासदार अण्णासाहेब …

Read More »

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेचा वर्धापन दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली येथील शाखेचा ९ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाखेचे उपाध्यक्ष वसंत बुद्धाळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन तर शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यशवंत …

Read More »

निपाणीत सोमवारी ‘तोरणा’ किल्ल्याचा लोकार्पण सोहळ्यासह गड किल्ल्यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आमाते गल्लीतील टपाल कार्यालया जवळील विघ्नहर्ता तरूणमं डळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी १० वर्ष वेगवेगळे‌ गडकोट किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या जातात. शिवाय दिवाळीनंतर ते नागरिकांसाठी खुले करून किल्ल्यांची माहिती सांगितली जाते. यंदा तोरणा किल्ल्याची निर्मिती …

Read More »