शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील कांदा बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिकाम्या गोणीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. १८ ते २० प्रतिकिलो रुपयांच्या दराने कांदा विका लागत असताना, तीच कांदा बारदाण्याच्या गोणीमध्ये भरला जातो. …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या …
Read More »युद्धाचा भडका अन् गॅस टंचाईसह दरवाढीचा फटका
हॉटेल व्यावसायिकांची धावाधाव; चढ्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ निपाणी (वार्ता) : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला, तसा गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे घरगुती गॅस २१ दिवसांनी मिळणार आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेल व्यावसायिक सिलिंडरसाठी दुप्पट रक्कम मोजत आहेत. तरीही त्यांना सिलिंडर …
Read More »अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोरगाव सर्कल रुंदीकरणाचे काम ठप्प
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सर्कलचा रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ ही मान्यवरांच्या हस्ते झाला. पण परिसरातील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरू झालेले रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह …
Read More »बोरगाव औद्योगिक पार्कबाबत आरोप सिद्ध करूनच बोलावेत विनाकारण अफवा पसरवू नयेत; नगरसेवक शरदराव जंगटे यांचा इशारा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलटेक्सटाईल पार्क औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले सर्व उद्योगधंदे हे कर्नाटक राज्यातील व्यावसायिकांनाच मालकी तत्वावर दिले आहेत. ३९ पैकी २० उद्योजकांना शासकीय सवलतीचा लाभही मिळाला आहे. हेउद्योजक कर्नाटक राज्यातीलच आहेत. पण काही नागरिकांनी हा प्रकल्प, इतर राज्यातील उद्योजकांना दिल्याचे अफवा पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य असेल …
Read More »शहरातील रस्त्यावरील उघड्यावरील गटारींचा पादचाऱ्यासह वाहनधारकांना अपघाताचा धोका
निपाणी (वार्ता) : शहरातील अनेक रस्त्यावरील गटारे तुटलेली, झाकणांशिवाय उघडी पडलेली असल्याने पादचाऱ्यासह वाहनधारकांना धोका होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या परिसरात तर अशा प्रकारचे अनेक उघड्या गटारी असल्याने नागरिकांसह ग्राहक आणि व्यापाऱ्यांना येजा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर …
Read More »स्तवनिधीत हेमाडपंथी पाषाण मंदिरामध्ये सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ व स्थवनिधी येथील ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री पार्श्वनाथ ब्रम्हचार्याश्रम गुरुकुलमध्ये चैत्र कृष्ण पंचमीच्या मुहूर्तावर हेमाडपंथी पद्धतीने पाषाण नूतन मंदिर निर्माण होत आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या या प्रवेशद्वारावरती, तवंदी डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या या मंदिरामध्ये नूतन नयन मनोहर भगवान १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती …
Read More »सहकारी संस्थेत राजकारण करू नका : माजी खासदार रमेश कत्ती
अकोळ विविधोद्देश ग्रामीण कृषी संघाच्या इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आणि रक्षण करणाऱ्या सैनिकांचे प्रत्येकानी आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. बाहेरचे लोक निपाणीत नको, त्यासाठी स्थानिक उमेदवारांची गरज आहे. शेतकऱ्यांना डिवचणाऱ्याना निवडणुकीत एका मताला एक लाख रुपये दिले तरी …
Read More »निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले कर्नाटक राज्य पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : बेंगळुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषदतर्फे आयोजित साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांना कर्नाटक राज्य पुरस्कार पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ज्ञानयोगी परमपूज्य श्री. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या ज्ञानदासोहाच्या प्रेरणेने आयोजित करण्यात …
Read More »आप्पाचीवाडी येथील पूल निर्मितीसाठीच ‘रयत’चा तहसील कार्यालयावर चाबूक मोर्चा
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. पुलाच्या कामाचे अनेकदा उद्घाटन झाले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम रखडल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केला. रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून तहसीलदार मुंजे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta