Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

ममदापूर (के. एल.) अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त उद्या दोन लाखाची बैलगाडी शर्यत

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर (के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रेला रविवार (ता.१९) पासून पालखी मिरवणुकीने प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता.२३) सकाळी ९ वाजता विविध शर्यती होणार आहेत. ‘अ ‘गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १ लाख …

Read More »

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर निपाणीत कोट्यवधींची उलाढाल

  सोन्याचे दर वाढूनही ग्राहकांचा खरेदीवर जोर निपाणी (वार्ता) : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी केली. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने-चांदीचे दर दुप्पट होऊनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अक्षय तृतीया सणादिवशी नवीन दागिने आणि नवीन वस्तू घरामध्ये घेण्याकडे अनेकांचा कल दिसून …

Read More »

निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती निमित्त मिरवणूक

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शिव बसव प्रतिमेची शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, विजय पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेला १०.६९ कोटींचा निव्वळ नफा

  संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी; ६७५ कोटींच्या ठेवी निपाणी (वार्ता) : प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांमुळे महात्मा बसवेश्वर संस्थेच्या ठेवी ६७५ कोटीवर गेल्या आहेत. मार्च अखेर ९५.१८ टक्के वसुली करून संस्थेला १० कोटी ६९ लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. रविवारी आयोजित संस्थेच्या कार्याच्या …

Read More »

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयराजे यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शिवाजी चौकात पताके लावण्यासह आकर्षक विद्युत रोषणाई …

Read More »

शिवजयंतीनिमित्त निपाणीत मिरवणुकीसह सजीव देखावा स्पर्धेचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांस शिवप्रेमी, युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौका चौकात पताके लावण्यात आले असून भगव्या ध्वजांनी शहर भागविणे बनले आहे. शिवजयंती निमित्त रविवारी (ता.१९ ) …

Read More »

वीरशैव समाजातर्फे निपाणीत आज शिव-बसव जयंती

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील वीरशैव समाज व समस्त हिंदू समाजा तर्फे येथे संयुक्त शिव-बसव जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवारी (ता.१९) सकाळी ८ वाजता वीरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी व बसव मल्लिकार्जुन स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-बसव नामकरण सोहळा होणार आहे. सोमवार (ता. २० ) रोजी सायंकाळी …

Read More »

पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान

  भर उन्हात कर्तव्यामुळे वाढला आरोग्याला धोका ; शहराचा पारा ४१ अंशावर निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका तीव्र झाला असून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर ‘बीट द हिट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच मोर्चे, विविध जयंत्या, कार्यक्रम आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी तासनतास उभे राहणाऱ्या पोलिसांना उष्णतेचा फटका बसत …

Read More »

बोरगाव आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. एआरडी सोसायटीच्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलच्या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील १०वी सीबीएसई परीक्षेत शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या परीक्षेत सक्षम पाटील (९४.९३ टक्के), स्तवन पाटील (९३.६), …

Read More »

निपाणीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा; कारवाई न झाल्यास जनावरे पालिकेत बांधण्याचा इशारा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना (कर्नाटक) व त्रस्त निपाणीकातर्फे शुक्रवारी (ता.१७) नगरपालिकेवर मोर्चा काढून नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. आठवड्याभरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास ही जनावरे नगरपालिकेत …

Read More »