Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

शिवसेना नेत्यांना पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले

  निपाणी : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मूक फेरीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले, यामुळे तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Read More »

बोरगावमधील किल्ला स्पर्धेत राजे ग्रुप विजेता

  नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; स्पर्धेला बालचमूसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जंगटे फाउंडेशनतर्फे यंदाच्या दिवाळी निमित्त शरद जंगटे यांनी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोरगाव आणि उपनगरातील बालचमू आणि युवकांनी नानाविध प्रकारचे आकर्षक गड किल्ले साकारले होते. त्यामध्ये निकम गल्लीतील राजे ग्रुपने प्रथम क्रमांक …

Read More »

निपाणीमधील कुत्र्यांच्या हल्ल्यातील रुग्णांना बोरगाव अरिहंततर्फे मदतीचा धनादेश

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसवाणनगर मधील ‌नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला झालेला होता. त्यामध्ये सात जणांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. अशा रुग्णांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यात आले. नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, माजी …

Read More »

प्रति टन साडेतीन हजारासाठी तवंदी घाटात एल्गार!

  कारखाने सुरू करू देणार नाही : राजू पोवार यांचा कारखानदारासह सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापुर, विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस पिक घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा कर्नाटक राज्य …

Read More »

नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी मिळविल्याने डॉ. प्रियांका जासूद यांचा निपाणीत सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांची कन्या डॉ.प्रियांका सागर पाटील यांनी नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी प्राप्त केली आहे. शिवाय अपघातातील मृत व्यक्तीच्या नेत्राचे दुसऱ्या व्यक्तीला यशस्वीरीत्या प्रत्यार्पण केले. या अवघड शस्त्रक्रियेमुळे त्यांचा येथील माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले सडोलकर यांच्या हस्ते …

Read More »

संगोळी रायण्णा पुतळा उभारणीत सर्वधर्मीयांचे योगदान महत्त्वाचे

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे : विविध समाजातील प्रमुखांची बैठक निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. चबुत-यावर पुतळा …

Read More »

ऊसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दिल्याशिवाय ऊस तोड देऊ नये

  राजू पोवार ; निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर दिल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये. …

Read More »

बोरगावात कापड दुकानासह तीन ठिकाणी चोरी

  लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास ; व्यवसायिकातून भीतीचे वातावरण निपाणी(वार्ता) बोरगाव येथे रविवारी (ता.२) रात्री चोरट्यांनी कापड दुकानासह तीन ठिकाणी चोरी करून लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे बोरगावसह परिसरातील व्यापारी वर्गासह नागरिकांतून भेटीचे वातावरण व्यक्त होत आहे. शिवाय पोलिस प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक …

Read More »

बोरगाव उरुसात भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

  Ø उत्तम पाटील यांची प्रशासनाला सूचना ; उरुसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यासमवेत पाहणी निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरुसाला शुक्रवारपासून (ता.७ नोव्हेंबर) प्रारंभ होणार आहे. या काळात पवित्रता, शांतता, स्वच्छता, आरोग्यं व मूलभूत सुविधांकडे प्राधान्य द्यावे. …

Read More »

मतदारसंघासह महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सुप्रिया पाटील; माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य महिला काँग्रेस सेक्रेटरी पदी निवड झाल्यामुळे आपल्या राजकीय जीवनाच्या वाटचालीला प्रारंभ झाला आहे. त्या माध्यमातून निपाणी मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेते मंडळींनी विश्वास ठेवून दिलेल्या पदाशी प्रामाणिकपणे राहून त्यांच्या निर्णयानुसार कार्यरत राहणार असल्याचे, मत सुप्रिया दत्त कुमार …

Read More »