Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

गणेशमूर्तीची विटंबना थांबवा

  विविध हिंदू संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीदेखील अनेक विषयांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित कृती होत नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रित तलाव’ यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारची मूर्तीची विटंबना होत आहे. …

Read More »

सलीम नदाफ यांच्या विज्ञानवारी शनिवारी नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेतील विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांच्या ‘विज्ञानावरी शनिवारी’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पुणे येथील एस. सी.ई.आर.टीच्या सहाय्यक संचालिका शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात …

Read More »

गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी

  निपाणीत गोविंदांचा थरार; रात्री उशिरापर्यंत गर्दी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाच्या गोविंदांनी थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज …

Read More »

समडोळीत गुरुवारी शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

  वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील; विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य, चरित्र्यचक्रवर्ती, समाधी सम्राट १०८ आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव समडोळी येथे गुरुवारी (ता.५) होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव …

Read More »

शिरोळच्या गोविंदा पथकाने फोडली निपाणीची दहीहंडी; दीड लाखाचे मिळवले बक्षीस

  निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

नियमांच्या चौकटीत गणेशोत्सव साजरा करावा

  तहसीलदार प्रवीण कारंडे; निपाणी शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

निपाणी नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता

  नाट्यमय घडामोडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेवर बालेकिल्ला अबाधित राखण्यात भाजपाला यश आले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

Read More »

आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक

  बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …

Read More »

पाठिंब्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय; नगरसेवक विलास गाडीवड्डर यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : राजकीय नेत्यांनी अहंकार न बाळगता सर्वसामान्यांची कामे करावीत. आपण पालकमंत्र्यांची बेळगाव येथे भेट घेऊन काँग्रेस पक्ष वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी आपल्याशी थेट संपर्क ठेवण्याचे सांगितले. मात्र नगरपालिकेत काँग्रेस पुरस्कृत आघाडी करण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी चर्चा …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार नाव नोंदणीची रितसर प्रक्रिया

  बुदिहाळचे वसंत पाटील यांची तहसीलदारांविरोधात तक्रार निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील शेत जमिनीच्या नाव नोंदणी विषयी खोटे मृत्युपत्र मृत्यू दाखले जोडले गेले आहेत, अशा आशयाची माहिती देत जंगम यांनी तहसीलदारांविरोधात शासनाच्या महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून बुदिहाळ येथील सदर जमीन पारंपरिक पद्धतीने करणारे …

Read More »