निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन शेतकरी, पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या परिसरात रोप लागवड करुन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ निंबाळकर, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, हरी कागले, सुशीला …
Read More »सहकाररत्न उत्तम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले …
Read More »पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने रोप लावणे आवश्यक
नगराध्यक्ष दिगंबर कांबळे; बोरगाव मध्ये पर्यावरण दिन निपाणी (वार्ता) : वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यातील पिढीला सुरक्षित व निरोगी जीवन देण्यासाठी आजच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा …
Read More »झाडे जगली तरच मानवतेचा श्वास टिकेल
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले; रासाई-शेंडूर येथे पर्यावरणदिन निपाणी (वार्ता) : निसर्ग वाचविणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. वाढते प्रदूषण, उष्णतेची तीव्रता, नष्ट होत चाललेली जंगलसंपदा आणि मानवी स्वार्थामुळे बिघडत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम सुखामागे धावताना माणूस निसर्गापासून दूर जात आहे. …
Read More »पाच वर्षांत मित्रांना ३ हजार रोपांची भेट निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; वृक्षप्रेम वाढविण्याचा घेतला वसा
जागतिक पर्यावरण दिनविशेष निपाणी (विनायक पाटील) : वाढदिवस, विवाह, वास्तूशांती, स्मृतिदिन, रक्षा विसर्जन अशा विविध प्रकारचच्या निमित्ताने इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा देशी वृक्षाचे रोपटी भेट देऊन वृक्षप्रेम वाढविण्याचा वसा येथील गायत्री नगरातील पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी जपला आहे. ५ वर्षांत त्यांनी ३ हजार रोपे मित्र परिवार व …
Read More »जोरदार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते. याशिवाय डोंगरावरून लहान मोठे दगड पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाहने थांबवून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत …
Read More »कणगला येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, बहिण गंभीर जखमी
निपाणी : कणगला परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची बहीण गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब लाटकर हे आज सकाळी सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या थोरल्या बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरून मोसोबा हिटणीमार्गे कणगलाकडे जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या …
Read More »सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ
स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्त्व आता सर्वांना कळू लागले आहे. त्यापासून वर शहर व परिसरात सायकल खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र सायकलच्या किंमतीत वाढ झाल्याने खिशाला कात्री लागत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सायकलच्या किमतीत चौथ्यांदा वाढ झाली आहे. …
Read More »निपाणीत इंटरनेट सेवेची गती मंदावल्याने आधार कार्डासह उतारे मिळविण्यासाठी धावपळ
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडल्या आहेत. याशिवाय ब्रॉडबॅण्ड इंटरनेटची गती मंदावली आहे. इंटरनेट सेवाभावी आधार कार्डसह, शेतीचे उतारे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने इंटरनेट सेवा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. शहर आणि …
Read More »मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार, कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची तसेच कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याबद्दल बुधवारी (ता.३) येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटप करत आपल्या नेत्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. राज्याच्या विकासाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta