Sunday , September 20 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले होते. शैक्षणिक व राष्ट्रीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या मयूरी मगदूम, भारतीय सैन्य दलातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झालेल्या सौरभ मगदूम यांचा गौरव करण्यात आला. संचालक कुमार माळी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर उच्च ध्येय गाठावे, असे आवाहन केले.
यावेळी शाखा उपाध्यक्ष वसंत बुधाळे, किरण निकाडे, हरी निकाडे, प्रदीप बुधाळे, विनायक तेली, सुधाकर व्हराटे, अमोल माळी, यशवंत पोवार, पांडुरंग पाटील, लक्ष्मण आबणे, रामचंद्र हेरवाडे, बाबुराव पाटील, बाळासाहेब वैराट, कृष्णा मगदूम, नितीन पाटील यांच्यासह संचालक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *