Monday , September 21 2026
Breaking News

पाण्यात बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाला यश

Spread the love

 

बेळगाव : गोकाक परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीच्या आधारे सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, निलेश हिरेहोळी आणि मायकेल पिंटो हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एसडीआरएफ आणि गोकाक अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्याने प्रतिकूल परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

या बचाव आणि शोधमोहीमेत सहभागी झालेल्या सर्व पथकांच्या तत्परता, धाडस आणि समन्वयाचे स्थानिक नागरिक व प्रशासनाने कौतुक केले.

दरम्यान, सोशल वर्कर रेस्क्यू टीमने पावसाळ्यात धबधबे, नद्या, तलाव आणि इतर जलाशय परिसरात फिरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, सुरक्षित अंतर राखावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

“Always Prepared To Serve” या ब्रीदवाक्यानुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्पर असल्याचा विश्वास सोशल वर्कर रेस्क्यू टीमने व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *