Sunday , September 20 2026
Breaking News

तारांगण-ज्ञानवर्धिनीतर्फे करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

 

खानापूर : महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तारांगण, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर व करंबळ गावचे ग्रामस्थ यांच्यावतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा करंबळ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हाडांचे तपासणी हृदयरोग तपासणी, दंत तपासणी, डोळे तपासणी, स्त्री रोग तपासणी, लहान मुलांचे तपासणी केली जाणार आहे. बेळगावातील सेंट्रल केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री ऑर्थो अँड ड्रामा केअर सेंटर, एम एम जोशी कोडकिणी आय सेंटर, वन डेंटल, गिझरे मॅटरनिटी हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या कडून तपासणी केली जाणार आहे आणि रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष सदानंद मासेकर, करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक यांअनिल कदम, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा जाधव यांचे नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर प्रमुख उपस्थिती ज्ञानवर्धिनीचे कार्याध्यक्ष श्री. विठ्ठल होसूर व खजिनदार सुभाष धबाले उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *