Sunday , September 20 2026
Breaking News

मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशनच्या बैठकीत राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन

Spread the love

बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्या वतीने शनिवारी अंजनेय नगर येथील बास जिम व्यायामशाळेत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राज्यभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीला कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोले प्रमुख उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष महेश गुंजीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम. गंगाधर यांची निवड करण्यात आली.

संघटनेचे उपखजिनदार चेतन देसाई यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा सादर केला. यंदाच्या वर्षात कर्नाटकभर विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्या माध्यमातून विविध खेळांतील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष पै. अतुल शिरोले यांनी संघटनेच्या उद्दिष्टांवर मार्गदर्शन करताना मागील वर्षी यशस्वीपणे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे आणि देणगीदारांचे त्यांनी आभार मानले. आगामी काळात अधिक मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीला राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोले, उपाध्यक्ष महेश गुंजीकर, सचिव नागेश सुतार, कार्याध्यक्ष एम. गंगाधर, खजिनदार भावेश बिर्जे, उपखजिनदार चेतन देसाई, महिला प्रमुख शाहीन डी., विद्या पाटील, रेश्मा चौगुले तसेच सदस्य कृष्णा जाधव, विजय तीप्पानाचे, दुंडेश नाईक, महेश पाटील, रामदास मुलेरखी, राहुल शिवंगेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *