Sunday , July 26 2026
Breaking News

गोव्याच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे निधन

Spread the love

 

 

पणजी : गोव्यातील ताळगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि पणजीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निधनाच्या वेळी त्या ५६ वर्षांच्या होत्या.

जेनिफर मोन्सेरात या गोव्याच्या राजकारणातील प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ताळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून केली. त्यानंतर त्या जिल्हा पंचायत सदस्या झाल्या आणि २०१२, २०१७ व २०२२ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ताळगाव मतदारसंघातून विजयी होत आमदार झाल्या. २०१९ मध्ये त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणूनही काम पाहिले.

त्यांच्या पश्चात पती तथा गोव्याचे महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार अतानासिओ (बाबूश) मोन्सेरात, पुत्र व पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तसेच परिवार आहे. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *