Friday , August 7 2026
Breaking News

चांद शिरदवाड येथील शयनाज कनवडे यांचा पदोन्नतीनिमित्त उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : चाँद-शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत बाबालाल कनवाडे यांच्या स्नुषा शहनाज आलम कनवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उत्तम आण्णा पाटील म्हणाले,
आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पोलीस दलासारख्या जबाबदारीच्या सेवेत महिलांनी मिळवलेले यश हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. कनवाडे यांची पदोन्नती ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून, मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाने प्रत्येक महिला आपले ध्येय गाठू शकते, याचा प्रेरणादायी संदेश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास आलम कनवाडे, प्रकाश पाटील, बाळकृष्ण रूपाळे, जाफर मुजावर, कुमार पाटील, मौला कनवाडे, डॉ. रायगोंडा पाटील, आप्पासाहेब कोल्हापुरे, नजीर चाऊस, जीवनधर फिरगन्नवर, चिंतामणी पाटील, सुभाष पाटील, बापूसाहेब पाटील, अबूबकर चाऊस साहेब, सतीश पाटील, गुंडराव पाटील, पद्मराज पाटील, प्रवीण पाटील, किरण कांबळे, बाहुबली कुटुळे, सम्मेद किनिंगे, बाहुबली मथुरे, गुंडूराव मिरगे, सुकुमार पाटील, दादा खरपे, दादा कोकणे, सुभाष गिरमल, सलीम चाऊस, बाबा इंगळे, शांतिनाथ तेरदाळे, रावसाहेब पाटील, शकील आत्तार, रजनीकांत पाटील, मनोहर गोटूरे, सद्दाम मुजावर, दावल भिसाई, वैभव गुरव, भरत खोत, महादेव रोहिदास, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष यास्मिन चाऊस, जयश्री किरण पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य, पी के पी एस अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, उत्तम आण्णा ग्रुप वर प्रेम करणारे सकार्यकर्ते व कनवाडे परिवार सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बागेवाडी कॉलेजमधील रोट्रॅक्ट क्लबचा उद्या पदग्रहण सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लब संलग्नित बेळगाव केली संस्थेच्या येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *