Sunday , September 20 2026
Breaking News

सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ बेळगावात भव्य मोर्चा; शिक्षण सुधारणांची जोरदार मागणी

Spread the love

 

बेळगाव : शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वंकष सुधारणांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करणारे शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी बेळगावात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि नागरिक संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, परीक्षा गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारी तडजोड याविरोधात आवाज उठविला.

यानंतर पंतप्रधानांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले. निवेदनात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीसह विविध परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची, तसेच शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी शांततापूर्ण आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईबद्दलही नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने त्यांच्याशी तातडीने संवाद साधून शिक्षण क्षेत्रातील सुधारणा राबविण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चात सहभागी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात न्याय, समान संधी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांचा आदर करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *