Monday , September 21 2026
Breaking News

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत; पिस्तूलाच्या स्रोताचा शोध

Spread the love

 

बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कोठून आणण्यात आले, याचा शोध बेळगाव शहर पोलीस घेत असून या प्रकरणातील अनेक धागेदोरे पुण्याशी जोडले गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गोळीबारानंतर संशयित आरोपींना पुण्यापर्यंत पोहोचविणाऱ्या कारच्या चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच्या चौकशीतून फरारी आरोपींचा ठावठिकाणा तसेच शस्त्रपुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंगळवार, 14 जुलै रोजी रात्री युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये सुरेश मुनीस्वामी जलगार (वय 42) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि लष्कराने जिमखानाला टाळे ठोकले असले, तरी मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

तपासादरम्यान गोळीबारानंतर आरोपी ज्या कारमधून पुण्याकडे रवाना झाले होते, त्या वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या गोळीबारामागे रमी क्लबमधील ‘अंदर-बाहर’ क्लबच्या नियंत्रणावरून सुरू असलेली वर्चस्वाची लढाई असल्याचे तपासात पुढे आले आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता हिंसक वळण घेतले असून, एकमेकांचा काटा काढण्यासाठी चाकू हल्ले आणि गोळीबारासारख्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वीही या दोन गटांमध्ये तीनहून अधिक गंभीर हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यावेळी या प्रकरणाची आवश्यक ती दखल घेतली गेली नसल्याची चर्चा आहे. परिणामी, हा संघर्ष अधिक तीव्र होत असून वेळेत कठोर कारवाई न झाल्यास या वादाचे रूप संघटित ‘गँगवॉर’मध्ये बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी फरारी आरोपींना तातडीने जेरबंद करून बेकायदेशीर जुगार अड्डे आणि संबंधित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *