Sunday , September 20 2026
Breaking News

बंगळूर येथील आयआयआयटी निवड झाल्याबद्दल साईराज पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचे शिक्षक जे. एस. पाटील यांचे चिरंजीव साईराज पाटील यांची बंगलोर येथे आय. आय. आय. टी. पदी निवड झाल्याबद्दल दोन्ही शाळे तर्फे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व मुख्याध्यापक बी. बी. दादण्णावर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साईराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले. तसेच यशस्वी होण्यासाठी आरआरआर हा अभ्यासाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना देऊन मार्गदर्शन केले.
साईराज यांने या यशासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पी. बी. माणगावे यांनी सूत्रसंचालन केले. एस. पी. मोरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *