Saturday , August 8 2026
Breaking News

संसद भवनाकडे मोर्चा; आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Spread the love

 

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी काक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन रविवारी तीव्र झाले. संसद भवनाकडे “चलो संसद” मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून लाठीचार्ज केला.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “चलो संसद” मोर्चासाठी आयोजकांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. त्यामुळे विनापरवानगी मोर्चा काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यापूर्वी देण्यात आला होता.

मात्र, आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचीही मोठी उपस्थिती होती. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते पुढे सरकत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर जंतर-मंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंढरीची वारी’ विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन

Spread the love  फोंडा (गोवा) : एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *