Sunday , September 20 2026
Breaking News

जिमखाना क्लब गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणारा कारचालक अटकेत

Spread the love

 

बेळगाव : शहरातील कॅम्प परिसरातील जिमखाना रम्मी क्लबमध्ये रौडीशीटर सुरेश जालगार याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपींना घटनास्थळी आणणाऱ्या कारचालकाला अटक केली आहे.

गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात नेण्यात आले. पुढे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जिमखाना रम्मी क्लबमध्ये झालेल्या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी रौडीशीटर सुरेश जालगार याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रसंगावधान राखत सुरेश जालगार यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोडक्यात बचावले.

प्राथमिक तपासात प्रफुल पाटील आणि सुरेश जालगार यांच्यातील जुने वैर या हल्ल्यामागील कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रफुल पाटीलच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबाराचा कट, त्यामागील सूत्रधार आणि सहभागी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *