Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

युवकांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत

  सहकाररत्न उत्तम पाटील‌; निपाणीत महामानवाला अभिवादन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून नागरिकांना हक्क व न्याय मिळवून दिला आहे. संविधानामुळेच देशाचा कारभार सुस्थितीत चालू आहे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून जीवनात वाटचाल करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन सहकाररत्न …

Read More »

दुर्गंधीयुक्त पाणी न हटवल्यास आंदोलन

  आंदोलन नगरातील नागरिकांच्या इशारा; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आंदोलननगर परिसरात नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातही या भागातील गटारी तुंबल्या असून, सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने घरांसमोर दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त …

Read More »

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेनाडीत मंगळवारी मोफत दुचाकी पंक्चर सेवा

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त, मंगळवारी (ता. १४) बेनाडी ते हुपरी, व बेनाडी ते निपाणी या मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची दुचाकी पंक्चर झाल्यास अशा वाहनांचे मोफत पंक्चर काढून देण्याची सेवा करण्यात आली आहे. पांडुरंग मधाळे यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर अलायमेंट …

Read More »

बोरगाव टेक्सटाईल पार्कमधील दुर्गंधीयुक्त कारखाना बंद करा

  १५ दिवसांची दिली मुदत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सरकारमान्य टेक्सटाईल पार्क परिसरात सुरू असलेल्या पशु खाद्य व प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामुळे दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत.या कारखान्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारखान्यातून सतत येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले …

Read More »

अभ्यासिकामुळे व्यक्तिमत्व विकास शक्य

  तहसीलदार सुरेश मुंजे; निपाणीत ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे …

Read More »

संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे

  प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन निपाणी (वार्ता) : भारत देशाची खरी ओळख त्याच्या विविधतेत आणि लोकशाही व्यवस्थेत आहे. या सर्वांचा पाया म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारे हे संविधान आजही आपल्या समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब …

Read More »

धार- पवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सागर पाटील ; निपाणीत समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : अनेक समाजाची मंडळी एकत्रीत येवून समाजाचा विकास साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धार-पवार परिवार विकासात मागे पडत होता. त्यामुळे १३ वर्षापूर्वी श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून ५ लाख धार-परिवाराला एकत्रीत करून त्यांचे जीवन उज्वल करण्याचे काम हाती …

Read More »

युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरापर्यंत

  खाद्यतेलांची प्रतिकिलो २०-२५ रुपयांनी दरवाढ ; महिलांचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले निपाणी (वार्ता) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असून त्याचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंवर दिसत आहे. स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर ताण वाढला आहे. सध्या निपाणी बाजारपेठेत सोयाबीन, पाम, सूर्यफूल तेलाची …

Read More »

समाजरत्न पुरस्काराने निपाणीमधील नामदेवराव चौगुले बेळगावमध्ये सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील श्री‌ सिद्धरामेश्वर ॲग्रो केंद्राचा ३२ व्या वर्धापन दिन काकती येथे पार पडला. अम्मा फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब उदागट्टी व भरमण्णा एल. उप्पार (राज्यमंत्री, कर्नाटक सरकार) वाढदिवसही पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ समाजसेवकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात …

Read More »

यरनाळच्या अंबिकादेवी यात्रेतील शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेंची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये मुरगूडच्या राणा मांगले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १० हजार १ रुपये रोख व ढाल बक्षीस मिळविले. या शर्यतीत रेंदाळच्या शरद पुणेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ७००१ रुपये आणि कणेरीच्या सुनील पाटील यांच्या बैलगाडीने ५००१ …

Read More »