Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी भागात भुईमुगाचे मोड वानरांकडून फस्त

Spread the love

 

उपद्रव वाढल्यानेअनेक गावांतील शेतकरी हैराण

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गावांत वानरांचा उपद्रव वाढला आहे. नुकत्याच उगवून आलेल्या भुईमुगाचे कोवळे मोड फस्त करत बसलेले वानरांचे कळप शिवारात दृष्टीला पडत आहेत. आधीच या खरीप हंगामात विविध समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी आता तोंडचा घास हिरवताना पाहून रडकुंडीला आला आहे.
काही दिवसापासून वानरांच्या कळपांनी कोवळ्या पिकांना लक्ष्य केले असून शेतकऱ्यांचा डोळा चुकवून वानरे भुईमूग, मका, पावट्याची शिवारे फस्त करत आहेत. घरांच्या छपरासह शिवारात वानरांच्या कळपांचा दिवसभर वावर असून छप्परावरून इकडून तिकडे उड्या मारण्यामुळे कौले फुटून नुकसानीच्या घटनाही घडत आहेत.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीचा ताबा वानरांच्या कळपांकडेच आहे .सध्या खरिपाच्या पेरण्या आणि टोकणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. परिसरात यंदा भुईमुगाचे क्षेत्र मो वाढले असून त्याचा वानराकडून फडशा पाडला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *