Sunday , September 20 2026
Breaking News

आडी-पंढरपूर दिंडी परमात्मराज महाराजांच्या उपस्थितीत रवाना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आडी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी “आनंद सोहळा” संघातर्फे पंढरपूर वारीसाठी दिंडीचे प्रस्थान झाले. पंढरपूर वारीसाठी भाविक, भक्त, वारकरी यांच्या साठी मोफत आयोजन केले होते. मंदिराचे पुजारी केरबा गुरव यांच्या हस्ते श्री विठ्ठल, रूक्मिणी देवाला अभिषेक करण्यात आला.

वीणा पूजन व पालखी पूजन परमात्मराज महाराजांच्या हस्ते झाले. दिंडी प्रस्थान प्रसंगी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, दिंडीचे अध्यक्ष नामदेव साळुंखे, विजय गुरव, अनिल येडूरे, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील (के रके), सखाराम साळुंखे, मारूती चव्हाण, राजेश पाटील, पुंडलिक गायकवाड, संपत खांडेकर, संजय गुरव, बजरंग आवळेकर यांच्यासह येथील वारकरी, भाविक, भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *