Sunday , September 20 2026
Breaking News

धारवाडमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची निर्घृण हत्या; पत्नी ताब्यात, मुलगा जखमी

Spread the love

 

धारवाड : चिरायु हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची धारवाडमधील कर्नाटक युनिव्हर्सिटी रोडवरील रॅन कास्टेलो अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांचा दहा वर्षीय मुलगा निहील हाही जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. या प्रकरणात डॉ. किरण यांच्या पत्नी डॉ. प्रियांका (प्रिया) होन्नणवर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात डॉ. प्रियांका यांनीच पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्यांनी मुलावरही हल्ला केल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. त्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही संशय असून, त्यांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घेतल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी झाले.

सध्या डॉ. प्रियांका यांच्यावर हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती किम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हसबी यांनी दिली. रक्तातील साखरेच्या चढ-उताराव्यतिरिक्त त्यांना इतर कोणताही शारीरिक त्रास नसून, त्यांना कोणताही मानसिक किंवा अन्य आजार असल्याची माहिती उपलब्ध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी डॉ. प्रियांका यांनी हत्येची कबुली दिल्याचे वृत्त समोर येत असले तरी, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पोलिसांकडून या हत्येचा नेमका हेतू आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *