Sunday , September 20 2026
Breaking News

रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करा

Spread the love

 

विजय मांजरेकर ; निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

निपाणी (वार्ता) : रोटरी क्लब हे सामाजिक कार्य करण्याचे माध्यम आहे. त्याद्वारे प्रत्येकाने समाजकार्याला वाहून घ्यावे. ‌ समाजकार्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवणे आवश्यक आहे. पूर परिस्थिती आणि इतर अडचणीच्या वेळी मदत करण्याचे ध्येय बाळगावे. नेहमी सकारात्मक भूमिका घेऊन समाजाला सहकार करावे. प्रत्येक रोटरी आणि आपल्या अर्जाकडे लक्ष देऊन काम करावे. चांगली भावना ठेवून काम केल्यास कोणतीही गोष्ट असे की नसल्याचे मत, आनंद मांजरेकर यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लबच्या परग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी चेतन लगारे, सेक्रेटीपदी राजेंद्र सदलगे तर खजिनदारपदी चिंतामणी वाळवे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (ता.१८) रोजी दुपारी पदग्रहण समारंभ
आंदोलन नगरातील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल येथे पार पडला. नूतन पदाधिकाऱ्यांचा कार्यभार वर्षभरासाठी राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पदग्रहण कार्यक्रमासाठी अशोक नाईक (डीजीई) तर मुख्य अतिथी म्हणून विजय मांजरेकर-चिकोडी व राजेंद्र पाटील, वसुंधरा कोले उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी दिव्या दिवाणी, सेक्रेटरीपदी श्रेया खेडेकर तर खजिनदारपदी स्मृती परमणे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा गव्हर्नर अशोक नाईक यांनी, निपाणी रोटरी क्लबचे कार्य प्रशासनीय असून या पुढील काळातही समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी आशिष कुरबेट्टी, प्रवीण तारळे, दिलीप पठाडे, महांतेश हिरेकुडी, सोमनाथ परमणे, पारस शहा, राजेश पाटील, वीरेंद्र उर्फ सचिन देशमाने, सुजय शहा, संजय नंदर्गी, सुनील बल्लोळ, सुबोध शाह, रमेश पै, प्रमोद जाधव, सुहास परभणी, वर्षा नंदर्गी, गणेश पट्टणशेट्टी, पवन रुत्तन्नावर, सतीश श्रीप्पानावर, शितल मेक्कळकी, डॉ. ज्योतिबा चौगुले रणजीत माने यांचीही विविध पदावर निवड करण्यात आली. संजय नंदर्गी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गणेश पट्टणशेट्टी आणि स्मृती परमणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास डॉ. सी.बी. कुरबेट्टी, प्रमोद जाधव यांच्यासह रोटरी आणि नवीन क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *