Sunday , September 20 2026
Breaking News

सराईत गुन्हेगार फहीम कोतवाल पुन्हा तडीपार

Spread the love

 

बेळगाव : शहरातील बेकायदेशीर मटका व्यवसायासह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेला सराईत गुन्हेगार फहीम जैलानी कोतवाल (वय ४५, रा. खंजर गल्ली) याच्यावर बेळगाव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा तडीपारीची कारवाई केली आहे. १६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्याला बेळगाव जिल्ह्याबाहेर हावेरी जिल्ह्यातील हावेरी टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फहीम कोतवालवर करण्यात आलेली ही दुसरी तडीपारीची कारवाई आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००५ पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेल्या फहीम कोतवालचा बेकायदेशीर मटका व्यवसायाशी घनिष्ठ संबंध असून, सांप्रदायिक दंगली, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न, अत्यावश्यक वस्तूंचा अवैध साठा तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा वारंवार सहभाग आढळून आला आहे.

त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४८ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये मार्केट पोलीस ठाण्यात ३४, खडेबाजार पोलीस ठाण्यात ७, माळमारुती पोलीस ठाण्यात ५, टिळकवाडी पोलीस ठाण्यात १ आणि सीईएन पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत बेळगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून, अशा प्रवृत्तींवर भविष्यातही प्रभावी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *