


निपाणी (वार्ता) : रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी संरक्षण भिंत, खेळाचे मैदान आणि वाचनालय उभारण्यासाठी मंजूर झाला आहे. त्यासाठी बोरगाव येथील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मोलाचे योगदान आहे.
यावेळी मंजुरीचे पत्र शेंडूर ग्रामस्थ, संस्थेचे संचालक व उत्तम पाटील प्रेमी यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी बंडोपंत लाड, पुंडलिक कुंभार, विठ्ठल चौगुले, दादू केसरकर, बाबुराव नार्वेकर, मारुती यादव, एस. बी. कांबळे, बाळासाहेब वाडेकर, रामदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि उत्तम पाटील प्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta