Sunday , September 20 2026
Breaking News

सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याबद्दल निपाणीत तहसीलदारांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जेष्ठ पर्यावरणवादी नेते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी जंतरमंतरवर उपोषण आरंभीले होते. २० दिवसाच्या आंदोलनानंतर त्यांना पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतले. निट पेपरफुटी हे निमित्त होते. पण ह्या निमित्याने एकुणच भ्रष्ट व्यवस्थे विरोधात हे प्रतीकात्मक आंदोलन होते. या निमित्त्याने देशातुन पाठींबा मिळाला. मोठ्या संख्येत युवक, युवक सहभागी झाले. आज हे आंदोलन अंतीम टप्प्यावर पोहचले असताना. वांगचुक यांना ताब्यात घेणे हे कृत्य निंदनीय आहे. या घटनेचा निपाणीतील लोकशाही प्रेमी नागरीकांतर्फे या घटनेचा जाहिर निषेध करीत तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

प्रा.डॉ. माने यांनी अशा लोकशाही विरोधातील घटना निपाणीकर जनता खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. उपदेशिलदार मृत्युंजय डांगे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे निवेदन पाठविण्याची ग्वाही दिली. यावेळी अस्लम शिकलगार, बाबासाहेब मगदुम, विवेक कांबळे, पॅथरसेना जिल्हा अध्यक्ष अमीत शिंदे, सुधाकर माने, गणू गोसावी, प्रा.आनंद संकपाळ, जयराम मिरजकर, अशोक खांडेकर, प्रा. एन. आय खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *