Sunday , September 20 2026
Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना व आर्यन फाउंडेशनकडून विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

Spread the love

 

बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना आणि आर्यन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खडेबाजार येथील श्री विठ्ठलदेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत कृष्णा मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमात मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच मंदिरासमोरील रस्ता मजुकर यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीट करून भाविकांसाठी अधिक सोयीचा केला.

यावेळी हणमंत कृष्णा मजुकर यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांना केळी आणि प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

या उपक्रमात सदानंद सदाकाळ, संदीप चौगुले, परशराम गोंदकर, कुशल मजुकर, रमेश पाटील, विनायक कुडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि आर्यन फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *