Sunday , September 20 2026
Breaking News

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love

 

बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा देवेगौडा यांचे शनिवारी बेंगळुरूतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

चेन्नम्मा या काही दिवसांपासून श्वसनाच्या त्रासाने आजारी होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी सायंकाळी बेंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.

चेन्नम्मा यांच्या निधनाची माहिती समोर येताच देवेगौडा कुटुंबीय तसेच जनता दल (सेक्युलर) पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *