Sunday , September 20 2026
Breaking News

केनवडे पी. एम. श्री. केंद्रशाळेत इको क्लबतर्फे वृक्षसंवर्धनाचा जागर

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : केनवडे येथील पी.एम.श्री. केंद्रशाळेत इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण, वाचन प्रेरणा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जीवन साळोखे गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पर्यावरणप्रेमी शिक्षक व भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले उपस्थित होते.
प्रारंभी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जीवन साळोखे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने शाळेला उपयुक्त पुस्तकांची भेट दिली. साळुंखे म्हणाले, वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि वृक्षांमुळे जीवन समृद्ध होते, असे सांगत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे तसेच प्रत्येकाने वृक्षांचे जतन करण्याचे आवाहन केले. सारिका कासोटे यांनी, “एक दिवस बळीराजासाठी” झाडांचा वाढदिवस साजरा करा, तसेच विद्यार्थ्यांनी वृक्ष दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्यासारखे अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी, कचरामुक्ती, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्ध या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवशी किमान एक तरी वृक्ष लावावा, प्रत्येक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, प्लास्टिकचा वापर टाळून निसर्गाशी मैत्री करावी, असे आवाहन केले.
मुख्याध्यापक विजयकुमार पाटील यांनी, एकाच व्यासपीठावर शिक्षण, वाचन आणि पर्यावरण या तीन महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणारे मान्यवर उपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. शाळेसाठी हा अत्यंत संस्मरणीय व प्रेरणादायी कार्यक्रम ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *