Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगावच्या ‘अरिहंत’च्या डिजिटल बँकिंगमुळे महत्त्वाचे पाऊल

Spread the love

 

अध्यक्ष अभिनंदन पाटील : संस्थेच्या क्युआर कोडचे अनावरण

निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. संस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्युआर कोड व मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण करून आपण डिजिटल बँकिंगच्या नव्या युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. या सुविधेमुळे सभासद आणि ग्राहकांना घरबसल्या सुरक्षित, जलद आणि सुलभ बकिंग सेवाउपलब्ध होणार आहेत. पैसे पाठविणे, शिल्लक तपासणे, व्यवहारांची माहिती घेणे, तसेच क्युआर कोडद्वारे तत्काळ डिजिटल पेमेंट करणे आता अधिक सोपे होणार असल्याचे मत बोरगाव येथील अरिहंत संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे अरिहंत संस्थेचा डिजिटल मोबाईल अॅप व क्युआर कोडचे अनावरण अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले,डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढून वेळेची बचत होते.आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतात. आय एफ एस सी कोड, क्यूआर कोड, मोबाईल अँप या सेवेमुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी अधिक सोपे व सुरक्षित होणार आहे. आपल्या संस्थेने ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञान द्वारे ग्राहकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून डिजिटल बँकिंग सेवा सुरू केल्याचे अभिनंदन पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास सहकाररत्न उत्तम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, पीरगौडा पाटील, अभयकुमार करोले प्रल्हाद कडोले, भुजगौडा पाटील, शरदकुमार लडगे, संदीप पाटील, जयपाल नागावे, श्रीकांत वसवाडे, शिवानंद राजमाने, बाबासाहेब अफराज, निर्मला बल्लोळे, अनिता मगदूम, अजित कांबळे सीईओ अशोक बंकापुरे, सहाय्यक व्यवस्थापक अभयकुमार खोत, अभिनंदन बेनाडे भरत गुंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *