Sunday , September 20 2026
Breaking News

हस्ताक्षर स्पर्धेमुळे भाषिक कौशल्यांचा विकास : एस. डी. वडराळे

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये हस्ताक्षर स्पर्धा

निपाणी (वार्ता) : डिजिटल युगात वाचन व लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे. शालेय स्तरावर हस्ताक्षर स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी आणि भाषिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते असे मत एस. डी. वडराळे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथीलएच. जे. सी. चीफ फाउंडेशन, कुर्ली व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे आयोजित दिवंगत जे. ए. अदाटे आंतरशालेय मराठी हस्ताक्षर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले हे होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत जे. ए. अदाटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. निलेश खिरुगडे यांनी हस्ताक्षर स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. एस. एस. चौगुले यांनी, सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व, भाषाशुद्ध लेखनाची गरज आणि नियमित सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. गोरख कुंभार यांनी या स्पर्धेचे कौतुक करत भविष्यातही अशा शैक्षणिक व संस्कारक्षम स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 189 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुबक व वाचनीय हस्ताक्षराचे उत्कृष्ट दर्शन घडवत मराठी भाषेप्रती असलेली आपली आवड आणि जिव्हाळा व्यक्त केला.
स्पर्धेत अनुक्रमे प्राथमिक गटात देवस्व बुजरे- किसनराव मोरे हायस्कूल सरवडे, प्रतीक्षा नेजे – एमजीएस- कुर्ली, तेजस्विनी खोत-एम जी एस हणबरवाडी, स्वराज पाटील-एम एच पीजीएस भाटनांगनूर, सम्रादणी पाटील- केंद्र शाळा तारळे यांनी तर माध्यमिक गटात आसावरी पाटील-किसनराव मोरे हायस्कूल सरवडे, शिवानी भिवसे – जी एम संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी, ऋतुजा चौगुले-सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली श्रेया खोत-कोगनोळी हायस्कूल कोगनोळी, गायत्री कांबळे – सरकारी मराठी हायस्कूल यमगरणी यांनी यश संपादन केले.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी एस. एस. साळवी, के. ए. नाईक, एस. ए. देसाई, एम. बी. खिरुगडे,पी व्ही कांबळे, एम एस वाळके, एस. ए. बारवाडे यांच्यासह विविध शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. एस ए पाटील यांनी सूत्रसंचालन केले ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *