Sunday , July 26 2026
Breaking News

राकसकोप धरण परिसरात विवाहितेचा विनयभंग; विरोध केल्याने बहिणीसह मोटारसायकलने चिरडण्याचा प्रयत्न, तिघे गजाआड

Spread the love

 

बेळगाव : राकसकोप धरण परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेत तिघा तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासह तिच्या बहिणीच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे महावीर संजय शिरोशी (रा. कुटलवाडी), ऋतिक तानाजी छपरे (रा. मच्छे) आणि काशिनाथ परशराम कनंबरकर (रा. मच्छे) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे कुटुंब मूळचे बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील बेळगली येथील असून, रोजगाराच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून राकसकोप येथे वास्तव्यास आहे. रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास संबंधित महिला राकसकोप धरण परिसरात गुरे चारण्यासाठी गेली असता तिघे आरोपी मोटारसायकलवरून तेथे आले.

आरोपींनी महिलेचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तिच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी करून अंगाला हात लावत गैरवर्तन केले. महिलेने याला विरोध करताच आरोपींनी तिच्या अंगावर मोटारसायकल घालण्याचा प्रयत्न करून तिला जखमी केले.

याचवेळी फिर्यादीच्या मदतीसाठी तिची बहीण घटनास्थळी धावून आली. मात्र आरोपींनी तिच्याही अंगावर मोटारसायकल घालून तिलाही दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग, दुखापत व अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान गुरुवारी (दि. १६) तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *