Sunday , September 20 2026
Breaking News

अक्कोळ पार्श्वमती विद्यालयात आरोग्य जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात चिकोडी येथील शासकीय रुग्णालयातर्फे डॉ. मंगल शास्त्री यांचा विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य रोगांपासून बचाव, संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली, किशोरवयीन आरोग्य तसेच ऋतूनुसार उद्भवणाऱ्या आजारांपासून बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्यदायी सवयी अंगीकारणे, स्वच्छतेचे महत्त्व, हात धुण्याची योग्य पद्धत, पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचे संरक्षण याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आरोग्यविषयक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, स्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता यांचा अंगीकार करून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या आरोग्याबरोबरच कुटुंब व समाजाच्या आरोग्याचीही जबाबदारी ओळखून आरोग्यदूत म्हणून कार्य करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे, टी. ए. घोसरवाडे, व्ही. डी. इंदलकर, पी. बी. कळंत्रे, एस. डी. खोत यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *