Sunday , September 20 2026
Breaking News

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : कारचालकाला हिंडलगा तुरुंगात धाडले; मुख्य सूत्रधार प्रफुल पाटील अद्याप फरार

Spread the love

 

बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या पुण्यातील कारचालकाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा प्रफुल पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने त्याचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे.

या प्रकरणातील अटक आरोपी रोहन पोकळे (रा. गणेश पेठ, पुणे) हा गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या कारचा चालक होता. १४ जुलै रोजी रमी क्लबमध्ये सुरेश जालगार यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी याच कारमधून बेळगावातून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेनंतर रोहन पुण्याला पसार झाला होता. तांत्रिक पुरावे आणि तपासाच्या आधारे कॅम्प पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या परवानगीने पोलीस कोठडीत सखोल चौकशी केली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रोहनला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर करत हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

खडेबाजार विभागाचे एसीपी शेखराप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वनकुद्रे व त्यांच्या पथकाकडून तपास वेगाने सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींनी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून या कटामागील संपूर्ण सूत्रे उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्य आरोपी अजूनही फरार

गोळीबाराचा मुख्य आरोपी प्रफुल पाटील अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके सक्रिय केली आहेत. या खळबळजनक प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *