Monday , September 21 2026
Breaking News

बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटा कुलमुखत्यारनामा (पॉवर ऑफ ॲटर्नी) आणि बनावट स्वाक्षरींचा वापर करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

कडोली येथील परशुराम धुडुम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपनिबंधक कार्यालयात खोटी स्वाक्षरी आणि बनावट छायाचित्रांचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीला उभे करत मालमत्तेची कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी दस्तऐवजांवरील छायाचित्रांच्या आधारे संशयितांचा शोध घेत मुख्य आरोपी इसाक इस्माईल मुजावर आणि नागराज रामचंद्र कडकोळ यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या नागराज कडकोळ याच्याविरुद्ध यापूर्वीही अंकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्या प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिरची, पीएसआय एच. एल. केरूळ आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *