Sunday , September 20 2026
Breaking News

नीट पेपरफुटी प्रकरण तापले; राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन

Spread the love

 

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे अनेक खासदार उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करत, नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याचीही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेत आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र काँग्रेसने आपली भूमिका कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवले.

या घडामोडींमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *